‘राजीवबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतात’, काँग्रेस पक्षाला मोठे नुकसान; नाना पटोलेंना दु:ख अनावर

Nana Patole-Rajiv Satav

मुंबई :- काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या २१ दिवसांपासून राजीव सातव जहांगीर रुग्णालयात उपचार घेत होते. यांच्या निधनाने संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्याने एक पोकळीच निर्माण झाली आहे. राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसले आहे. अवघ्या ४७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली. दरम्यान, यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाना पटोले यांनी राजीव सातव यांच्या जाण्याचे काँग्रेस पक्षाचेही मोठे नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली. सातव आपल्याला लहान भावाप्रमाणेच होते. आज माझ्यासाठी आणि तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस आहे. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. काय बोलावं, काय लिहावं काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. मित्रा तुला भावपूर्ण श्रद्धांजली…” अशा पटोलेंनी त्यांच्याशी असणारे नातं व्य़क्त केले. ‘राजीवबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतात’ असेही ते जड अंत:करणाने म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button