महिला टी-२० विश्वचषक; पहिल्या सामन्यात भारत विजयी

सिडनी :- आयसीसी महिला टी-२० विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाचा डाव ११५ धावांवर आटोपला. भारताच्या पूनम यादवने भेदक गोलंदाजी केली. ४ गडी बाद केले. भारताने दिलेल्या १३३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली.

शिखा पांडेने बेथ मुनीची विकेट घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने मेग लॅर्निंगची विकेट घेत दुसरा धक्का दिला. फिरकीपटू पूनम यादवने अलिसा हिलीची विकेट घेत भारताला तिसरे यश मिळवून दिले. १२व्या षटकात पूनमने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेत ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के दिले; पण तिच्या पाचव्या चेंडूवर झेल सुटला. हॅट्ट्रिक हुकली. मात्र पुढच्या ओव्हरमध्ये पूनमने जेस जोनासेनला बाद करत ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट घेतली. पाठोपाठ शिखाने सदरलँडला बाद करत भारताला आणखी एक यश मिळून दिले.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यावेळी नवीन काय?

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६ चेंडूत २१ धावांची गरज होती. भारतीय संघाने अखेरच्या दोन फलंदाजांना धावबाद केले. भारताकडून पूनमने सर्वाधिक ४ गडी बाद केले. शिखाने २ तर राजेश्वरीने गडी बाद केला. भारताच्या १३२ धावांमध्ये दीप्ती शर्माच्या नाबाद ४९ धावा आहेत.


Web Title : Womens t-20 world cup india won the first match

Maharashtra Today : Online Marathi News Portal