महिला टी-२० विश्वचषक : भारत उपांत्य फेरीत

Womens T-20 World Cup- India in the semifinals

मेलबर्न : लेडी सेहवाग म्हणून मैदान गाजवणारी शफाली वर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्डच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३२ चेंडू राखून सात गड्यांनी हरवले. भारताचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे.

या विजयाने भारताला ‘अ’ गटात सर्वाधिक आठ गुण मिळाले आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी करून श्रीलंकेला ११३ धावांत बाद केले. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक चार, राजेश्वरी गायकवाडने दोन तर दीप्ती शर्मा, शिखा पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या जोडीने भारताचा डाव सुरू केला. स्मृतीला उद्देशिका प्रबोधिनीने १७ धावांवर बाद केले.

त्यानंतर शफाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने दुसऱ्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. कौर १५ धावा करून बाद झाली. दरम्यान शफाली अर्धशतकाजवळ पोहचली होती. पण ४७ धावांवर ती धावबाद झाली. पण तोपर्यंत भारत विजयाच्या जवळ पोहचला होता.

फॉर्म्युला थ्री रेसिंगमध्ये आता महिला रेसिंगपटू, सोफिया फ्लोर्श घडवणार इतिहास