महिला क्रिकेटमध्ये एलिस पेरी ठरली ‘दि बेस्ट’

Ellyse Perry

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या पुरस्कारांमध्ये (ICC Players of the Decade) महिला गटात आॕस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पेरी हिला स्पर्धाच नाही. कसोटी, वन डे आणि टी-20 या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तीच दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली आहे.

एलीस पेरीशिवाय (Elysse Perry) कसोटी सामन्यांसाठी मिताली राज, सुझी बेटस्, मेग लॕनिंग, सारा टेलर व स्टेफनी टेलर ह्यासुध्दा दावेदार होत्या. वन डे सामन्यांसाठी मिताली राज, सुझी बेटस्, मेग लॕनिंग, झुलन गोस्वामी व स्टेफनी टेलर आणि टी-20 सामन्यांसाठी सोफी डेव्हिन, डियांड्रा डेव्हिन, एलिसा हिली, मेग लॕनिंग, एन्या श्रुबसोल या स्पर्धेत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER