उत्तर प्रदेशमधील महिला असुरक्षित : राज्यमंत्री विश्वजीत कदम

राज्यमंत्री विश्वजीत कदम

सांगली : उत्तर प्रदेशमधील महिला असुरक्षित (Women insecure)आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा घटना घडत असताना उत्तर प्रदेश सरकार झोपी गेले आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी भाजपवर (BJP) केली आहे.

उत्तर प्रदेश केंद्र सरकारची मोठी दहशत आहे. त्यामुळे तेथील जनतेमध्ये देखील दहशत निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अत्याचार त्वरित थांबली पाहिजेत. तसेच हाथरस (Hathras) येथील पीडित कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकारने त्वरित मदत केली पाहिजे, अशी मागणीही कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER