मुस्लिम समाजातील महिलांनी शिक्षण घेऊन सक्षम व्हावे – उपायुक्त मीना मकवाना

औरंगाबाद : मुस्लिम सामाजातील महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शासनाकडून अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना राबिवल्या जात आहेत. याचा महिलांनी लाभ घ्यावा. डिजीटल युगात वावरताना मुस्लीम महिलांनी शिक्षण घेवून सक्षम व्हावे. असे आवाहन पोलीस उपायुक्त मिना मकवाना यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्या विकास परिषद, महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद, मानव संचाधन विकास मंत्रालय व बाल पृष्ठ आहार मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जागृती सेवा संस्थान समिती यांच्या माध्यमातून ‘अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी महिलांमध्ये डिजीटल साक्षरता कार्यक्रम’ व प्रयास क्लासेस मार्गदर्शन शिबीर मौलाना आझाद संशोधन केंद्रात सोमवारी (दि.२) पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीचे उपअधिष्ठता डॉ. शिवाजी सुक्रे, कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, सह संचालिका गिता म्हस्के, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रांचे संचालक गंगाधर जाधव, कामगार सह उपायुक्त युवराज पटीयाळकर, गट शिक्षणाधिकारी चव्हाण, जिल्हा प्रभारी प्रयास तय्यब पठाण, कौशल्य विकास परिषदेचे संचालक साजीद पठाण, गब्बर ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसुद अन्सारी, मेरून्निसा खान, फिरदोस खान, ॲड. आशा रसाळ, संतोष मिसाळ, डॉ. अभिषेक राठी यांची उपस्थिती होती.

साजीद पटेल म्हणाले, केंद्र सरकारच्या प्रयास क्लासेस अभियानातून गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी काम केले जात आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अल्पहार दिला जातो. यासाठी विविध संस्थेच्या माध्यमातून काम केले जात आहे. अल्पसंख्याक समाजातील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पटेल यांनी केले.

दरम्यान, महिलांमध्ये डिजीटल साक्षरता कार्यक्रमातून विशेष कौशल्य संपादन केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये मंगला दगडू शिरसाठ, मोहम्मद जकी मोहम्मद शफी, पठाण नाजीम अब्दुल रहेमान, आबाराव आळंजकर, मिर्झा अजीम बेग, सय्यद रफिक भिकन, दत्तात्रय गोंगे, शेख अहेमद, दिपक वानखेडे, शेख अन्सुर, आदींचा समावेश आहे. यावेळी जिल्हातील विविध भागातील अल्पसंख्याक महिलांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.