शेतकरी आंदोलनातील महिला झळकल्यात ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘टाइम’ मॅगझिनने (Time Magazine) आपल्या मार्च महिन्याच्या आंतरराष्ट्रीय अवृत्तीच्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनामध्ये (farmers movement) भाग घेतलेल्या महिलांचा फोटो छापला आहे. या फोटोला “भारतातील शेतकरी विरोध प्रदर्शनाच्या मार्गावर” अशी ओळ देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागील चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. टाइमच्या या अवृत्तीमध्ये या आंदोलनाचे वृत्तांकन आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक महिलांशी चर्चा करुन त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखामध्ये करण्यात आळा. “आम्ही परत जावे असे का म्हटले जात आहे? हे केवळ पुरुषांचे आंदोलन नाही. आम्ही सुद्धा शेतकरी आहोत,” असे ७४ वर्षीय जसबीर कौर यांनी टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

ऑक्सफैम इंडियाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील ८५ टक्के महिला कृषी क्षेत्राशीसंबंधित काम करतात. मात्र देशातील शेतजमीनीच्या मालकीपैकी केवळ १३ टक्के शेतजमीन महिलांच्या नावावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER