पंतप्रधान जनधन योजनेचा फायदा घेण्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलाच पुढे

Prime Minister Jandhan Yojana

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा वापर करत असताना महिलांनी पुरुषांना मागे ठेवले आहे. या योजनेंतर्गत महिला संपूर्ण देशात बहुतांश राज्यांमध्ये समान पातळीवर आहेत. पंतप्रधान जनधन योजनेत महिलांनी बँक खाती उघडण्यातही बाजी मारली आहे. आकडेवारीनुसार २७ जानेवारी २०२१ पर्यंत पंतप्रधान जनधन खाती एकूण ४१ कोटी ७५ लाख इतकी  उघडण्यात आली आहे. या खात्यातून २३ कोटी, १२ लाख २६ हजार १९९ महिलांची खाती तर १८ कोटी ६२ लाख ७२ हजार ०७७ पुरुषांची खाती आहेत.

या खात्यात महिलांचा समावेश जास्त आहे. या योजनेत सरकार ही खाती उघडण्यासाठी बरेच फायदे देत असतात. दुसरीकडे एसबीआयने जनधन खातेधारकांना एक लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी एसबीआय ‘रुपे जनधन कार्ड’साठी (SBI RuPay Jan Dhan Card) बँकेत अर्ज करावा लागेल. जनधन योजनांतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. मात्र, चेकबुकची सुविधा हवी असेल तर किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. भारतातील प्रत्येक नागरिक या योजनेंतर्गत आपले खाते उघडू शकेल. पंतप्रधान जनधन योजना राष्ट्रीय आर्थिक समावेशन अभियानांतर्गत ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू करण्यात आली.

जनधन खाते हे बचत खात्यासारखेच आहे. सरकारी हमीबरोबर इतरही फायदे आहेत. आपल्या फॉर्मद्वारे बँक खाते जनधन खात्यात रूपांतरित करू शकता. जनधन खात्याचा फायदा म्हणजे खात्यातून ओव्हरड्राफ्टद्वारे १० हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. तसेच काही महिन्यांकरिता जनधन खात्याची योग्य देखभाल करण्यात येईल. त्यानंतरच सुविधा उपलब्ध केली जाईल. जनधन खाते उघडणार्‍याला रुपे डेबिट कार्ड दिले जाते. या खात्यातून पैसे काढू शकेल किंवा खरेदी करू शकेल. याद्वारे जनधन खात्यातून विमा, पेंशन प्रोडक्ट्स खरेदी करणेदेखील सोपे आहे. सरकारी योजनांच्या फायद्याचे पैसे थेट या खात्यात जमा केले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER