भाइंदरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून महिलेवर बलात्कार

Rape

ठाणे : भाइंदरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये (Bhayander quarantine center) खासगी सुरक्षा रक्षकाद्वारे एका २० वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape case) करून तिला गर्भपात करण्यास बाध्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबतचे वृत्त फ्री जर्नालिसम या इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

या घटनेमुळे नागरिक, स्थानिक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर टीका केली जात आहे. कोरोना साथीविरुद्ध लढ्यात मीरा-भाइंदर महानगरपालिकेचा (Mira-Bhayander Municipal Corporation) भोंगळ कारभार सतत समोर येत आहे. कधी क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना चांगले भोजन मिळत नाही तर कधी कोविड रुग्णालयात कामगार दारू पिताना पकडले जातात. आता मनपाने चालवलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

केस भाइंदर (पूर्वेकडील) गोल्डन नेस्टमधील क्वारंटाईन सेंटरची आहे. २४ मे रोजी पीडित महिलेची सात वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये आली होती. दरम्यान, २ ते ५ जून दरम्यान आरोपी सुरक्षा रक्षकाने दूध आणि गरम पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत प्रवेश करत महिलेवर बलात्कार केला आणि कोणाला काही सांगितले तर तिला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना बलात्काराची माहिती कळताच त्यांनी नवघर रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्रम शेरे (वय २७) हा सैनिक सेक्युरिटी या खाजगी एजन्सीत काम करत होता.

या प्रकरणात सक्रिय भूमिका निभावणारे सामाजिक कार्यकर्ते रमजान खत्री यांचे म्हणणे आहे की, पीडितेच्या पतीने तिला घटस्फोट देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीडित महिलेला तिच्या सासरवाल्यांकडून त्रास दिला जात आहे. गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी पुष्टी केली की, आरोपीची पूर्व पडताळणी करण्याव्यतिरिक्त आम्ही एजन्सीची सत्यता आणि त्याची भरती प्रक्रिया सत्यापित करण्यासाठी कागदपत्रांचीही योग्य तपासणी करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER