३ लाखाची लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक

एमटी ब्यूरो

औरंगाबाद : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकची कारवाई रोखण्यासाठी ३ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या महिला उपविभागीय अधिकाऱ्यास औरंगाबाद लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली.

जालन्यातील अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी 3 लाखांची लाच मागितली होती. काल औरंगाबाद लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सविता चौधर यांना रंगेहाथ अटक केली आहे.

दरम्यान सविता चौधर यांच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्या घरातून 2 लाख 10 हजार रुपयांची रोकड तसेच अर्धा किलो सोनं आणि 4 फ्लॅटचे कागदपत्रंही आढळून आहेत आहेत.

यानंतर सविता चौधर यांना अटक करण्यात आली असून, लाचलूचपत विभागाने त्यांना जालना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.