राहुल गांधींशी लग्न करायला जाते ! विमानतळावर महिलेचा गोंधळ

इंदूर : मला राहुल गांधींशी (Rahul Gandhi) लग्न करायचे आहे, असे सांगून एका महिलेने मध्यप्रदेशातील इंदूरच्या विमानतळावर (Indore airport) गोंधळ घातला. तिच्याजवळ विमानाचे तिकीटही नव्हते. विमानतळावर अडवल्यामुळे गोंधळ झाला.

विमानतळाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानंतर तिने त्यांना धमकी दिली – मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे. राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला जाते आहे. मला त्यांच्याशी लग्न करायला जायचे आहे. माझे लग्न झाल्यानंतर तुम्ही सगळे मला सलाम कराल! पोलिसांना बोलवण्यात आले.

चौकशीत लक्षात आले की, ती परदेशीपुरा भागात राहते व मानसिक रुग्ण आहे. काही दिवसांपासून अनेकदा ती घरातून पळून गेली आणि काहीतरी कारण काढून लोकांशी भांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER