धनंजय मुंडेंविरुद्ध महिलेने केली बलात्काराची तक्रार

Dhanajay Munde

मुंबई :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात सदर तरुणीने तक्रार दिल्याची माहिती आहे. ती मुंडे यांच्या नात्यातली आहे, असे कळते. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही, असे ट्विट तिने केले आहे.

तक्रारीत तिने म्हटले आहे की, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. तिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ट्विट केले आहे. मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विटमध्ये टॅग करून तिने मदत करण्याची विनंती केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर तिने आरोप केला आहे की, मुंडे २००६ पासून तिच्यावर अत्याचार करत आहेत. तुला गायिका बनायचे असेल  तर मी बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांशी भेटून तुला लॉन्च करीन, असे आमिषदेखील दाखवण्यात आल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER