ती आहे एकुलती एक, वडिलांचा शोध घेतला तर आतापर्यंत मिळालीत ६३ भावंड!

ब्रिटन : ब्रिटनमधली (UK news) २३ वर्षांची कियानी एरोयो चार वर्षांची असताना तिच्या लक्षात आले, की बाकी सगळ्या मुलांच्या घरात आई-वडील आहेत; आपले पालक मात्र दोन्ही स्त्रियाच आहेत. तिला आपल्या वडिलांबाबत जाणून घेण्याची खूपच उत्सुकता होती.

कियानीला पित्याबद्दलच्या फार थोड्या गोष्टी माहीत होत्या. त्यांना कला आणि खेळांमध्ये रस होता. कियानी चित्र काढते. सर्फिंग करते. या आवडी पित्याकडून आलेल्या आहेत, असं तिला वाटते कारण आईच्या कुटुंबात असे कोणी नव्हत. पित्याकडून आपल्याला आणखी कोणकोणत्या गोष्टी मिळाल्यात, याबद्दल ती सतत विचार करत असायची. मग तिला कळले की ती आहे टेस्ट ट्युब बेबी.

‘काही काळानंतर स्पर्म डोनरची ओळख पटू शकते’ याचा आधार घेऊन कियानीने आपल्या वडिलांचा शोध घ्यायचाच चंग बांधला. कियानीने स्पर्म बँकेशी संपर्क साधला. तिला आवश्यक माहिती मिळाली. फक्त वडिलांबाबतच नव्हे तर भावंडांबाबतही. कियानी १५ वर्षांची असताना तिचा एका कुटुंबाशी संपर्क आला होता. त्या महिलेला जुळ्या मुली होत्या. त्यांचा जन्मही तिच्या पित्याच्या स्पर्मपासूनच झाल्याचे तिला कळले. त्या लहान मुलींशी खेळून तिला खूप बर वाटल होत. नंतर तिने इतर भावंडांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

कियानीचा जन्म ज्याच्या स्पर्मपासून झाला, त्या व्यक्तीने त्याचे प्रोफाइल खासगी ठेवल होत. कियानीने एका स्पर्म डोनर कंपनीसाठी एक प्रमोशनल व्हिडिओ केला. तो पाहिल्यानंतर तिच्या पित्याने त्याचे प्रोफाइल सार्वजनिक (पब्लिक) केले. यावरून कियानीने आपल्या भावंडांचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर ती भावंड अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांत असल्याचे समजले. आतापर्यंत तिला ६३ जणांची माहिती मिळाली आहे. त्या सर्वांचा जन्म कियानीच्या पित्याच्या स्पर्मपासूनच झाला आहे. कियानी फ्लोरिडात राहते. त्या शहरातचा तिची १२ भावंड राहतात! कियानी म्हणते – कोरोनाची साथ संपल्यानंतर पुन्हा एकदा भावंडांचा शोध घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button