जेव्हा तिने चक्क Swimming Pool मध्येच केली कार पार्क

Car Park in Swimming Pool

अमेरिकेमध्ये चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने चक्क स्विमिंग पूलमध्येच गाडी घातली. फ्लोरिडामधील वेस्ट पाम बिच पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडलेल्या एका अजब-गजब अपघाताचा फोटो सोशाल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये एका महिलेने चक्क स्विमिंग पूलमध्ये गाडी घातल्याचे दिसत आहे. “नशिबाने या अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झालं नाही. चालक आणि तिच्याबरोबरच्या प्रवाशाने वेळीच बाहेर उडी मारल्याने दोघेही वाचले,” असं पोलिसांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गाडी मागे घेत असतानाच चुकून जास्त रेस केल्याने गाडी थेट स्विमिंग पूलमध्ये बुडाली.