ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार, कोविडसाठी केंद्राने पाठवलेला निधी पडून

CM Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला (MVA) केंद्र सरकारने कोरोनासाठी दिलेल्या निधीपैकी निम्मा निधीही खर्च (Central assistance fund) करता आलेला नाही. ३९३ कोटी रुपयांपैकी केवळ १८० कोटी रुपये राज्याने खर्च केले असून, आता सर्व जिल्ह्यांकडून अखर्चित निधी परत मागवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जूनपर्यंत हा निधी खर्च करावयाचा होता. तर दुसरीकडे करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी देणगी दिलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ या खात्यात ४३१ कोटींचा (Rs 431 Cr)निधी वापराविना पडून आहे. राज्य शासनाकडून सातत्याने आर्थिक अडचणी असल्याचा पाढा वाचला जात असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ खात्यातील निधी वापरला जात नसल्याचा विरोधाभास अधोरेखित होत आहे. सध्या राबवल्या जात असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ (My Family My Responsibility) या अभियानावर १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

‘लोकसत्ता’ने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला मुख्यमंत्री सहायता निधीचे सहायक लेखाधिकारी मिलिंद काबाडी यांनी दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च ते सप्टेंबर या काळात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५७३ कोटी ४० लाख ७९९ रुपये जमा झाले. त्यापैकी केवळ १४१ कोटी ७३ लाख ३६ हजार ९४१ रुपयेच आतापर्यंत खर्च झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कक्षाकडून ३० सप्टेंबपर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. त्यात सेंट जॉर्ज रुग्णालयाला २० कोटी, रत्नागिरी आणि जालना जिल्हा रुग्णालयांना करोना चाचणी प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी १ कोटी ०७ लाख ६ हजार ९२०, औरंगाबाद येथील मजूर रेल्वे अपघातातील १६ श्रमिकांना ८० लाख, श्रमिकांच्या रेल्वे तिकिटाच्या भाडय़ापोटी ८३ कोटी ११ लाख ७३ हजार १०१, रक्तद्रव चाचण्यांसाठी १६ कोटी ८५ लाख आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानावर १५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

अशातच केंद्र सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील निधीही मंजूर झाला असताना आधी दिलेल्या निधीतील ७५ टक्केही निधीच्या खर्चाची अट महाराष्ट्राने पूर्ण केलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता आरोग्य प्रशासनाची धावपळ उडाली आहे. आता सर्वच जिल्ह्यांकडून अखर्चित निधी मागवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. अखर्चित निधी किती होता हे पाहून मग पुन्हा आवश्यक असणाऱ्या जिल्ह्यांना या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. १९ आक्टोबरपर्यंत हा निधी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही याची बळीराज्यालाही खात्री’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER