मुखपट्टी न लावता,दार उघडून राणा दाम्पत्याचा फिल्मी स्टाईल बस प्रवास वांद्यात

Navneet Rana-Ravi Rana Melghat-Bus Journey-No Mask

अमरावती :  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नुकताच धारणी ते परतवाडा बसने प्रवास करून प्रवाशांच्या समस्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. यातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडिओ शेअर करताना राणा दाम्पत्याचा फिल्मी स्टाईल (Film Style) बस प्रवासच वांद्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघे शुक्रवारी मेळघाटच्या दौऱ्यावर होते. परतीच्या वेळी धारणी ते परतवाडा बसने प्रवास करून प्रवाशांच्या समस्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. यातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली आहे.
मात्र, बस प्रवास करताना कोरोनातून मुक्त झालेले राणा दाम्पत्य कोरोनाचे नियम विसरलेले दिसत आहेत. त्यांचा फिल्मी स्टाईल बसचे दार उघडे ठेवून केलेला प्रवास आणि मुखपट्टीचा वापर टाळल्याने नवा वाद उद्भवला आहे.

व्हिडीओ काढताना नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे धावत्या बसचे दार उघडे ठेवून बोलत होते. बससोबतच धावणाऱ्या दुचाकीवरून व्हिडीओचे चित्रिकरण करण्यात आले. हे सर्व धोकादायक आहे. याशिवाय त्यांनी बसमधून प्रवास करताना मुखपट्टयांचा वापर केला नाही, म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

राज्यातील काही भागात नवीन बसेस दिल्या जातात. मुंबईत तर वातानुकूलित बसेस धावत आहेत. पण, मेळघाटात मात्र वीस-वीस वष्रे जुन्या बसमधून आदिवासींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. धारणीहून अमरावतीला बसने यायला पाच तास लागतात. अनेक बसेसची दारे तुटलेली, खिडक्यांना काच नाही, खडखड आवाज करीत अत्यंत धिम्या गतीने एसटीचा प्रवास सुरू आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. परिवहन मंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला अजूनही वेळ मिळालेला नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला.

याविषयी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही परतवाडा ते धारणी असा ९० किमीचा प्रवास एसटी बसने करून आदिवासी बंधू-भगिनींच्या व्यथा जाणून घेतल्या. मेळघाटात जुनाट भंगार बसेस चालविल्या जातात हा आदिवासींच्या जीवाशी चालणारा खेळ त्वरित थांबवून किमान सुखरूप प्रवास होईल अशी व्यवस्था राज्य शासनाने करावी.

ही बातमी पण वाचा : जरा घराबाहेर पडा आणि… ; नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER