पवार ऍक्शन मोडवर : मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट नांगरे पाटलांना बोलावले, अर्धा तास चर्चा

Sharad Pawar called Nangre Patil directly, half an hour discussion

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात मनसुख हिरेन (Mansukh Hiren) आणि मोहन डेलकर यांची आत्महत्या प्रकरणं चांगलीच गाजत आहेत. विरोधकांनी या दोन्ही प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारला (Thackeray Govt)चांगलेच कोंडीत पकडले. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे काल मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट न घेता थेट मुंबई पोलीस कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटलांना आपल्या निवासस्थानी बोलावून जवळपास अर्धा तास चर्चा केली. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रात्री उशिरा सिल्व्हर ओक या निवासस्थानी विश्वास नांगरे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली असून, कायदा आणि सुव्यवस्थेची भेटीत चर्चा झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यात गाजत असलेल्या मनसुख, डेलकर आणि वाझे प्रकरणावर दोघांची चर्चा झाल्याचीही सूत्रांनी माहिती दिली. शरद पवारांच्या भेटीसाठी विश्वास नांगरे पाटील(Nangre Patil) रात्री उशिरा सिल्व्हर ओकवर पोहचले होते. ते जवळपास अर्धा तास सिल्व्हर ओकवर होते. त्यामुळे दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालीय. मुकेश अंबानीच्या घराबाहेर जी स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यात आली होती, त्याच मुद्द्यावर ही भेट झाल्याची माहिती मिळतेय.

महत्त्वाचे म्हणजे मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण आणि त्या प्रकरणाशी मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांचा असलेला संबंध यावर चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच शरद पवारांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचीही माहिती घेतली असावी, अशीही चर्चा सुरू आहे.

ही बातमी पण वाचा :  पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; भाजप उमेदवार देणार, तर राष्ट्रवादी शांत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER