राज ठाकरेंचा विनामास्क नाशिक दौऱ्यावर ; मास्क काढ, माजी महापौरांना सूचना

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक (Former Nashik Mayor Ashok Murtadak) आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला.

राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम धाब्यावर बसवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मात्र आता त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकमध्ये विनामास्क नागरिकांना 1000 रुपये दंड केला जातो. त्यामुळे नाशिक महापालिका आणि पोलीस आता राज ठाकरे यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या लग्न सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावत आहेत. त्यानंतर राज ठाकरे मनसेच्या निवडक पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER