महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर भाजपाला दुर्बीणने शोधावे लागले असते : शिवसेनेच्या खासदाराची टीका

Ashish Shelar - Balasaheb Thackeray - Arvind Sawant - Maharashtra Today
Ashish Shelar - Balasaheb Thackeray - Arvind Sawant - Maharashtra Today

मुंबई : राज्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) आशीर्वाद नसते तर गावागावांत दुर्बिणीने भाजपाला (BJP) शोधावे लागले असते, असा टोला शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपाला लगावला आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कुबड्यावर होता. आमची कुबडी आणि आमची शिडी घेऊन भाजपा महाराष्ट्रात वाढली. संघाच्या शाखेवर दोन माणसे उभी असायची. राज्यात भाजपाचा विस्तार शिवसेनेमुळे (Shiv Sena)झाला.

ही शिडी भाजपानं विसरणं म्हणजेच कृतघ्नपणा आहे, असा टोला सावंत यांनी भारतीय जनता पार्टीला लगावला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांना कथित धमकी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात वादंग पेटले आहे . भाजपाची अवस्था म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, अशी झाली आहे. सत्तेत येण्यासाठी शिवसेनेची बदनामी केली जातेय. बेळगावचा प्रश्न जिवंत राहिला तो शिवसेनेमुळेच. १०६ हुतात्मे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी दिले. बेळगावसह महाराष्ट्रासाठी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर पोरकटपणे बोलू नये. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात माजी मुख्यमंत्री प्रचाराला बेळगावात गेले होते. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

आशिष शेलार यांना विकृती नव्हे तर विकार झाला आहे, असा टोला अरविंद सांवत यांनी आशिष शेलारांना (Ashish Shelar) लगावला आहे. पंढरपूरच्या निकालानंतर राज्य सरकारवर संक्रमण येणार असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही मोठ्या राज्यांत तुमचा पराभव झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने पहिला राजीनामा द्यायला हवा. त्यानंतर आमच्या सरकारवर बोला, अशा शब्दांतही अरविंद सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button