कांदा निर्यातबंदी मागे घ्या : खासदारांचे निवेदन

Withdraw the onion export ban.jpg

नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी (onion export ban) त्वरित मागे घ्यावी याकरिता खासदार डॉ. भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गोयल यांना निवेदन सादर केले असून निर्यातबंदी त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक आहेत. येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांची त्यावर अवलंबून असलेल्या व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे.

व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातीसाठी सीमेवर अडकून पडला आहे. त्यासाठी सीमा खुली करावी. कांद्याच्या किमती खूप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवणे गरजेचे आहे.

आधीच लॉकडाऊनच्या संकटातून शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदीने मोठे नुकसान होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER