इंदुरीकर महाराजांविरुद्धचा गुन्हा मागे घ्या; समर्थकांची मागणी

Withdraw the case against Indurikar Maharaj, demand of supporters

संगमनेर : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी त्यांच्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी आज संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन दिले.

इंदुरीकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यात आला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा समर्थकांनी दिला आहे. इंदुरीकर महाराज कीर्तनात म्हणाले होते – ‘सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते.’ या कीर्तनाचा व्हिडीओ ‘मराठी कीर्तन व्हिडीओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. यावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन केले, असा आरोप करत अहमदनगरच्या PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.

यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे १९ जूनला संगमनेरचे वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी महाराजांविरुद्ध तक्रार दाखल केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER