राष्ट्रवादी व काँग्रेस कोणत्या विचाराने शिवसेनेसोबत आलेत ते कळथ नाही : नितीन गडकरी

Nitin Gadkari

मुंबई :- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना शिवसेनेच्या विचारांमध्ये कोणती प्रेरणा मिळाली नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. एका वृत्तवाहिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हे दोन्ही पक्ष कोणत्या विचाराने शिवसेनेसोबत गेलेत ते कळतच नाही. कुठला विचार कुणाल पटला? हा प्रश्न मलाही पडला आहे. मला तर असा कोणताही धागा दिसत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या विचाराने शिवसेनेसोबत गेली त कळायला मार्ग नसल्याचा टोला गडकरी यांनी लगावला.

अवैध ऑनलाईन लॉटरीवर नियंत्रणासाठी पोलिस व वित्त विभागाचे अधिकारी पश्चिम बंगालला जाणार

गडकरी म्हणाले या देशात मतभिन्नता हा विषय नाही. ती असली तरी हरकत नाही. मनभेद असता कामा नये. मतभिन्नतेपेक्षाही घात करते ति विचारशून्यता. हा माझा विचार आहे, माझी संघटना आहे. एकवेळ मी जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. हा माझा विचार असल्याचे गडकरी म्हणाले. आम्ही राजकारणात भगवे कपडे घालून प्रवचन द्यायला आलो नसल्याचे सांगत गडकरी म्हणाले, सत्तेत जाण्यासाठी आलो. एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीवर प्रेम करतो. त्यावेळी एव्हरी थिंग इज फेअर इन लव्ह असे म्हणतात ना? तो नियम राजकारणारतही लागू पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरेंनी जो हिंदुत्वाचा विचार मांडला होता, ज्या कारणासाठी त्या काळात प्रमोदजी आणि बाळासाहेब यांनी युतीचा निर्णय घेतला होता. तो विचार आणि आज उद्धव ठाकरे करत असलेला विचार यामध्ये तफावत असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पक्षाला काय दिशा द्यायची हा त्यांचा निर्णय आहे. मात्र ही जी दिशा त्यांनी स्वीकारली आहे ती त्यांनी विचारपूर्वक स्वीकारली असावी. मात्र त्यामुळे कधी ना कधी उद्धव ठाकरेंना याची अडचण होणार आहे. मला उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता तेव्हा त्यांनी मला विचारले तुम्ही नाराज आहात का? मी म्हटले बिलकुल नाही. कारण राजकारणात या सगळ्या गोष्टी सुरुच असतातबाळासाहेब ठाकरे यांचे स्थान माझ्या मनात आहे. राजकारणात विचारधारेपेक्षा, सिद्धांतापेक्षा जेव्हा सत्ता महत्त्वाची ठरते तेव्हा अनैसर्गिक आघाड्या होतात त्या फार काळ टीकत नाहीत असे इतिहास सांगतो. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या मूळ विचारधारांमध्ये फरक आहे. त्यामुळे ही आघाडी फार काळ टीकेल असे वाटत नाही. कारण अशा आघाड्या टीकत नाही हे देशाच्या राजकारणात वारंवार दिसून आले आहे आहे” असेही गडकरींनी म्हटले आहे.