राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 52 हजारांवर, सरकारची चिंता वाढली

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 667 झाली आहे. आज 2436 नविन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 38 जण मुंबई, पुण्यात 11, नवी मुंबईमध्ये 3, ठाणे, औरंगाबाद प्रत्येकी 2, सोलापूर, कल्याण डोंबिवली , रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना आज सुटी देण्यात आली आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52,667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 30 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 479 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 15,786 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 42 पुरुष तर 18 महिला आहेत. त्यातील 27 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 29 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 60 रुग्णांपैकी 38 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे आजार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER