राज्यातील सत्ता गेल्याने चंद्रकांतदादा यांचे मानसिक संतुलन ढळले : हसन मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patli) मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी आज कोल्हापुरात पदवीधर प्रचार मेळाव्यात केली.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही. पाटील यांच्याकडे असणाऱ्या मंत्रिपदाचा त्यांनी काहीही उपयोग केला नाही. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणारे सार्वजनिक बांधकाम खाते आणि राज्यातील दोन नंबरचे पद माझ्याकडे असते तर मी काचेचे रस्ते केले असते, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER