जळगावची सत्ता हातून गेल्याने महाजनांना ईडीची आठवण येते – एकनाथ खडसे

Eknath Khadse - Girish Mahajan - Maharastra Today

जळगाव :- ईडीकडून मिळालेल्या चौकशीची तारीख जवळ आली की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हमखास कोरोना होतो, असा खोचक टोला भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला होता. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनामुळे किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळेच वीस दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. मला अशा प्रकारचे नाटक करणे जमत नाही. जळगाव महानगरपालिका हातातून गेल्यामुळे गिरीश महाजन त्यांना चांगलाच झटका बसला. त्यामुळेच त्यांना ईडी वगैरेची आठवण येते, खोचक उत्तर खडसे यांनी दिले.

यावेळी बोलताना खडसे यांनी महाजनांच्या जखमेवर मीठ चोळले. जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) झालेल्या पराभवाची आठवण त्यांनी करुन दिली. गिरीश महाजन कोरोनामुक्त झाले त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जळगावची महानगरपालिका गिरीश महाजन यांच्या हातातून गेल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. कदाचित त्यामुळे त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.

सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीबद्दल बोलताना खडसे म्हणाले, ईडीची चौकशी लावणारे महाजनच आहे. त्यांच्याकडून ईडीला सूचना दिल्या जातात असे अप्रत्यक्षपणे सांगितले. ईडीची चौकशी दुसरं कोण लावतं?, ही चौकशी तुम्हीच लावली आहे. ईडी लावून छेडण्याचे काम तुम्हीच करता. त्यामुळेच तुम्हाला ईडी आठवत आहे, असा टोला खडसे यांनी महाजनांना लगावला.

ही बातमी पण वाचा : ईडीची तारीख आली की, खडसेंना हमखास कोरोना होतो, गिरीश महाजनांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button