
मुंबई : गेल्या काही काळात सोशल मीडियावर सुरू झालेल्या टिक-टॉक विरुद्ध युट्यूब या वादामुळे टिक-टॉकच्या रेटिंगमध्ये कमालीची घसरण झाली होती. परंतु गुगलच्या मदतीने टिक-टॉकने आपली लोकप्रियता पूर्वपदावर आणली आहे. टिक-टॉक आणि युट्यूब या दोन अॅप्लिकेशन्समध्ये श्रेष्ठ कोण? असा वाद निर्माण झाला होता.
परिणामी दोन्ही कम्युनिटीमधील युजर्स मोठ्या प्रमाणावर एकमेकांविरोधात टीका करत होते. या वादाचा परिणाम टिक-टॉकचा रेटिंगवर झाला. अनेकांनी या अॅपविरोधात निगेटिव्ह रिव्ह्यू लिहिण्यास सुरुवात केली. परिणामी टिक-टॉकचं रेटिंग ४.४ वरून १.२ पर्यंत पोहचलं होतं. परंतु टिक-टॉकने गुगल प्लेच्या मदतीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता पूर्वपदावर आणली आहे. त्यांनी निगेटिव्ह रिव्ह्यू, व्हिडीओज, कॉमेंट सर्व काही डिलिट करून पुन्हा एकदा आपले रेटिंग ४.४ पर्यंत आणले आहे. दरम्यान भारतातही टिक- टॉक क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला