लसीकरणाच्या टक्क्यात घसरण, राज्य सरकार आरोग्य कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यायला कमी पडतंय का?

Rajesh Tope - Coronavirus Vaccination

भारतात लसीकरणाला धडाक्यात सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचं स्वागत केलं. कोरोनाशी (Corona) लढण्यात आघाडीवर असल्यामुळं त्यांना सर्वात आधी कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लसीकरण व्यवस्थीत झालं नंतर दोन दिवस को-विन एप बंद असल्यामुळं लसीकरणाला स्थगिती देण्यात आली होती. लसीकरणासाठी नोंदणी या एपद्वारेच केली जाते. लसीकरण पुन्हा सुरळीत सुरु व्हावं म्हणून ऑफलाईन लसीकरण करण्याची परवानगी राज्य शासनाकडून केंद्राकडे करण्यात आली. पण केंद्राने नकार दिला. दोन दिवसांनतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाची लस घेणाऱ्यांचा आकडा घटल्याचा पहायला मिळतंय.

मागील ४८ तासांपासून राज्यात लस घेणाऱ्यांचा आकडा घसरलाय. याचं प्रथमदर्शनी कारण म्हणजे कोरोना लसीसंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात असलेली भीती. आणि याच कारणामुळं लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नकार दिलाय. असं आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचं मत आहे. यावरून राज्य सरकार लसीकरणासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना विश्वासात घेण्यात कमी पडतंय का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

आत्तापर्यंत ५१ हजार ६६० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आलीये. बुधवारी १८ हजार १६६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या शनिवारी ६६ टक्के, मंगळवारी ५२ टक्के तर बुधवारी ६८ टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली. राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणाविषयीच्या उदासीणतेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपेंना (Rajesh Tope) विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले, ”लसीकरणासाठी सर्वांनी प्रतिसाद द्यावा. सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी सरकारकडे सकारात्मक नजरेनं पहावं. लशीला घाबरण्याच कारण नाही. लोकांनी मनातली शंका काढून टाकावी. “

कोविन एपचं दिलं कारण

कोरोनाची लस घेण्यास आरोग्य कर्माचारी का नकार देता आहेत याबद्दल बोलताना टोपे म्हणाले, “ कोविन एप अजून स्लो आहे. त्यात तांत्रिब बिघाड दिसतोय. त्याचं लिंकिंग लसीकरण केंद्रवर करण्यात आलंय. नोंदणी झाल्यास मेसेज किंवा फोन आला नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन विचारणा करावी.  जागा उपलब्ध असेल तर त्यांना तेव्हाच लस घेता येईल.” मुंबईत बुधवारी १,७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलीये. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा २०० हून अधिक आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू ही बातमी झाली होती व्हायरल..

कोरोनाची लस घेतल्यामुळं आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाची बातमी व्हायरल झाली होती. सोशल मिडीयावरुन ही बातमी पसरवण्यात आली. ही बातमी बाहेर आल्यानंतर सहाजिकच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली. यावर स्वतः मोदी सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून नये. ही बातमी खोटी आहे. या आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू लस घेतल्यामुळं नाही तर हृदयविकाराच्या धक्क्यामुळं झाल्याचं सांगण्यात आलंय. काही लोकांना लसीकरणाच्या किरकोळ समस्या दिसल्यात. ही लक्षणं सौम्य असल्यामुळं घाबरून जाण्यास कारण नाही. असं ही सांगण्यात आलंय.

राज्य सरकार करणार आरोग्य कर्मचाऱ्यांच कौन्सलिंग

लसीकरण केल्याने आरोग्यावर परिणाम होत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यास समाजात सकारात्म संदेश जाईल. सामान्य नागरिक लस घेण्यात संकोच करणार नाहीत. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच समुपदेशन करण्यात येणार आहे.

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER