सर्वांच्या संमतीनेच पवारांनी देशमुखांना गृहमंत्री बनवले ; राष्ट्र्वादीने राऊतांना खडसावले

Nawab Malik-Sanjay raut

मुंबई : सामनातील आजच्या रोखठोक सदरात शिवसेनेने गृहमंत्रीपदाबाबत गौप्यस्फोट करुन अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रीपद मिळाले आहे असे म्हणत राष्ट्रवादीलाच डिवचले आहे. देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील (R.R Patil) यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते.असेहि शिवसेनेने म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते वर नवाब मलिक(Nawab Malik) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

डॅमेज कंट्रोलसाठी खरंच मला सुरूवातीचे ४८ तास माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

नवाब मलिक म्हणाले की, डॅमेज कंट्रोल साठी खरच मला सुरूवातीचे ४८ तास माहिती मिळाली नाही. जेव्हा मला माहिती पाठवण्यात आली त्यानंतर मी गृहमंत्र्यांन संदर्भात माहिती माध्यमांसमोर दिली. तसेच पक्षातील सर्व नेत्यांची मते जाणूनच पवारांनी देशमुखांना गृहमंत्रीपद दिले असेही मलिक म्हणाले यावेळी नवाब मलिक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सल्लाही दिला आहे. गृहमंत्र्यांनी जेव्हा आपल्यावर टीका होईल तेव्हा त्या टीकेतून शिकलं पाहिजे. अशा टीकेला उत्तर न देता त्यातून आपण शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, असा सल्ला नवाब मलिक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button