नाथाभाऊंच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल- छगन भुजबळ

एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी मध्ये स्वागत

eknath khadse & chhagan bhujbal

आज भाजपाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वागत केले आहे….

एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत त्यांनी भाजपा या पक्षाला महाराष्ट्रात मोठे केले,विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे, राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चित पणे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास देखील श्री भुजबळ यांनी व्यक्त केला…

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो असे मत श्री.भुजबळ यांनी व्यक्त केले…

एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल त्यांच्यामुळे पक्षाला अधिक फायदा होणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले….

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER