पवारांच्या मार्गदर्शनात ठाकरे सरकार स्थिर, नव्या समीकरणाच्या बातम्या निरर्थक – संजय राऊत

मुंबई : शनिवारी माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात गुप्त बैठक झाली होती. त्यांच्या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या भेटीमागचं कारण खुद्द संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा:- फडणवीस आमचे वैयक्तिक शत्रू नाही, भेटीची उद्धव ठाकरेंना माहिती होती – संजय राऊत

शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळगरामध्ये भेटलो नव्हतो. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती. मला ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो” असा टोला राऊतांनी लगावला.

यावेळी त्यांनी राजकीय भूकंपाच्या चर्चेवरही स्पष्टीकरण दिले. राज्य सरकारचा योग्य रीतीने कारभार सुरू आहे. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. सध्या जी व्यवस्था आहे, ती पाच वर्षांसाठी पुरेशी आहे. राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सांभाळत आहेत. शरद पवार त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन आहे. त्यामुळे या भेटीतून कोणतेही समिकरण तयार होणार नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केले.

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्रयेऊ शकणार नाही. चर्चा करायची असले तर ती केली जाऊ शकते. आपल्याकडे चर्चेला काही बंधन नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा नाही, असा खरमरीत टोलाही राऊतांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER