पवारांच्या आशीर्वादाने ‘ठाकरे’ सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, संजय राऊतांचा दावा

Maharashtra Today

मुंबई :- काँग्रेसच्या कुरघोडीमुळे आणि तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये शिवसेना (Shivsena) नाराज आहे, या फक्त आणि फक्त वावड्या आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची कुणालाही गरज नाही. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरी होते. त्यामुळे ते बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराज असल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली. आणि शिवसेना नाराज असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतर अनेक विषय आहेत. प्रत्येकवेळी राजकारणावरच चर्चा व्हायला हवी असे नाही. तसेच शरद पवार यांचा या सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून ‘ठाकरे’ सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

दरम्यान, काल अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांनी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे पवार यांना सांगितल्याची माहिती पुढे आली आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर हालचालींना वेग, अजितदादांसह नेतेमंडळी भेटीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button