कोरोनाच्या संकटात बर्ड फ्ल्यूचेही संकट, या राज्यांना अलर्ट जारी

मुंबई :- कोरोनाचा संकटकाळ (corona-crisis) अद्यापही कायम असताना आता भारताला दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. देशातली पाच राज्य बर्ड फ्लूच्या संकटात सापडली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब , हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा (Bird flu) धोका वाढला आहे. . बिहार, झारखंड आणि उत्तराखंड राज्य सरकारने अलर्ट जाहीर केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हिमाचलप्रदेशात मासे, कोंबडी, आणि अंडी विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान 425 हून अधिक कावळे, बगळे आणि इतर पक्षांचा यामुळे मृत्यू झाला आहे. झालावडच्या पक्ष्यांना नमुना घेण्यासाठी भोपाळमध्ये राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानात पाठवण्यात आलंय. इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या चाचण्यांच्या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाहीत.

काही अधिकाऱ्यांनी हिमालच प्रदेशात असणाऱ्या कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुलं हे संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER