भाजपत जाण्याच्या चर्चेवरून अजित पवारांनी आपल्याच आमदाराला मारला टोला

Ajit Pawar

बारामती :- राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहे. मात्र बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर विधानसभेच्या जागेबाबतची शंका असल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांपैकी एकजण भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार भरणे यांना भरसभेत टोमणा मारला. अजित पवार म्हणाले, इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचे सर्व बारामतीकरांच्यावतीने स्वागत, असेच प्रेम आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असे सूचक वक्तव्य केल्याने ते भविष्याचा वेध घेऊन तर हे वक्तव्य करत नाही ना, असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे.

ही बातमी पण वाचा : सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना संपविण्याचे षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाही – अजित पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्ण घेतल्यामुळे साहाजिकच इंदापूरची जागा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील किंवा आमदार भरणे यांच्यापैकी एकालाच मिळणार त्यामुळे हर्षवर्धन यांना उमेदवारी दिल्यास भरणे भाजपत जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हेसुद्धा भाजपत जाणार अशा वावड्या उठत आहे.

आज बारामतीत एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माजी उपमुख्यमंत्री पवार आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे व एकत्र आले होते. त्यावेळी भाषण संपताना अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराचे स्वागत केले, त्यावेळी उपरोक्त सूचक वक्तव्य म्हटले. त्यामुळे ही चर्चा रंगली आहे.

ही बातमी पण वाचा : विखे पाटलांनी कॉंग्रेस –राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यांची नावे जाहीर करावी : अजित पवार