तो फोटो हा ५ वर्ष जुना, नाईक कुटुंबीयांसोबत असलेल्या फोटोवरून पवारांचे स्पष्टीकरण

Sharad Pawar - Anvay Naik Family

पुणे : रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेनंतर अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्या आत्महत्या प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू झाली. सोशल मीडियामध्येही त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. ही चर्चा सुरू असतानाच नाईक कुटुंबीयांचा राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नाईक कुटुंबीयांनी पवारांची भेट घेतली आणि त्यानंतरच कारवाईला सुरूवात झाली असं त्यामधून सूचित करण्यात येत होतं. आता खुद्द शरद पवारांनीच त्या फोटोबद्दल खुलासा केला आहे.

पवार म्हणाले, सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो हा ५ वर्ष जुना आहे. तो आत्ताचा नाही. राज्याच्या राज्यपालांनी अर्णब यांची विचारपूस केली त्यामुळे बरं वाटलं. पण ज्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांचीपण विचारपूस केली असती तर आणखी बरं वाटलं असतं असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER