एका कोळीयाने……..!

एका कोळीयाने

काल दुपारी आठवणीतल्या कविता हे पुस्तक चाळत होते. खूप छान शाळेतल्या कविता तर त्यात सापडल्याच, पण त्यापलीकडे आणखीनही काही कविता सापडल्या की त्याच्यामुळे मी आठवणीत रमले. त्यातलीच ही एक कविता. “एका कोळीयाने एकदा आपुले घर बांधीयले उंच झाली….” आणि माझ्या डोळ्यासमोर ते म्हणणारी माझी आजी जशीच्या तशी उभी राहिली ! तिला जाऊनही आज पंचवीस वर्ष झालीत त्यावेळी ती 87 वर्षाची होती आणि त्या जुन्या काळी ती चौथी शिकलेली. पुण्याच्या हुजूरपागेतील विद्यार्थिनी. अफाट पाठांतर आणि वाचन! त्यावेळच्या अनेक कविता माझ्या पाठ झाल्या होत्या.

“कोळ्याचा प्रयत्न”हि कविता इतकी जुनी आहे. आठवणीतील कविता भाग 1 मध्ये तिचा समावेश असून समोर कवीचं नाव उपलब्ध नाही. मुख्य म्हणजे तिची कडवी दिंडी साकी अशा वेगवेगळ्या वूत्तांमध्ये गुंफलेली आहेत. आणि मुख्य म्हणजे ती आज आपल्याला उपलब्ध असलेल्या” Low of wasted efforts “या नियमांशी जुळलेली आहे. हा खरा निसर्ग नियमच !

एक कोळी उंच जागेवर जाळ बांधतो.-परत खाली येतो. चार वेळा तो परत चढून जातो पण खाली येतो, दमतो ही !आशा चालली जाते, रडू येऊ लागत, पण परत एकदा धीर धरून चधून जातो. तरीही अयशस्वी होतो. त्यालाही वाटतं या जगात माझ्या इतका दुर्दैवी जीव मीच ! परत नेटाने उठतो धागा चढायला लागतो. आणि शेवटची ओळ आहे,” झटे निश्चयाचे बळे अंती त्याला यश मिळे !”खूप शिकवतो छोटा प्राणी आपल्याला आणि त्या कवीचे निरीक्षणही दांडगे आहे. खूप सुंदर वर्णन केले आहे त्याचं. ती कविता खूप आवडली कारण ती माझ्या” प्रिय आजी ची कविता” आहे.

फ्रेंडस ! आपण सगळेजण एखादी गोष्ट मिळवण्यात जरा एक दोन वेळा अपयश आलं, एखादा ध्येयं साध्य करणं जमत नसलं तर किती पटकन हार मानतो. हातपाय गाळून बसतो, कधी कधी तर अपयशामुळे वाटेल ती, नको ती पावले ही उचलली जातात ! पण या कवितेत त्या छोट्याशा कोळ्याने केलेल्या प्रयत्नाची प्रक्रिया इतकी सुंदर मांडणी आहे, आणि खरंतर ध्येयाप्रत पोहोचण्याची कुणाचीही प्रक्रिया किंवा प्रोसेस हीच खूप महत्त्वाची आणि आनंददायी असते, असायला हवी !पण आम्ही ती कधीच एंजॉय करत नाही. सारखं लक्ष धेय्यावर !

काय कारण असावं याचं ? हा निसर्ग नियम आहे असे मी यासाठी म्हटले की उपजतच प्राण्यांमध्ये निसर्गातील सजीवांमध्ये मानव वगळता ही समज असते. कारण त्यांचे जगणे Low of Conflict नुसार चालते. जंगलच्या नियमात दया माया क्षमा या भावना नसतात. त्या कठोर नियमात जर तुम्ही शिकार केली नाही तर तुम्ही स्वतःलाच समोरच्याची शिकार होता. याउलट मानव हा प्रगत स्थिरावलेला परिपूर्ण संस्कृतीने वसलेला प्राणी आहे. कीव, दया, सहानुभूती राग निराशा या भावनांचा अनुभव तो घेतो.

सिंह जंगलाचा राजा प्रयत्नांमध्ये फक्त २५% टक्के यशस्वी होतो म्हणजे तो त्याच्या प्रयत्नात पैकी ७५% अपयशी ठरतो. यशाची टक्केवारी लहान असूनही तो पाठलाग व शिकार करण्याचा प्रयत्न बाबत निराश होत नाही. याचे कारण केवळ “भूक “हे नाही. तर तो निसर्ग नियम आहे. तो निसर्गात उपजतच रुजलेला आहे, “Low of wasted efforts !”

माशांची अर्धी अंडी खाल्ली जातात, बरीच अस्वल तारुण्यापूर्वीच मरतात. झाडांच्या बिया म्हणजे नवीन झाडांची रुजवात पण बहुतेक झाडांच्या बिया पक्षीच खातात. बागेत तर हा अनुभव नेहमी येतो की पक्षी खुप नेटाने प्रयत्न करून छान घरटे बांधतात. त्यात अंडी दिसतात. चिमणा चिमणी त्यांची राखण करतात. कधी कधी तर छोटीशी पंख न फुटलेली पिल्ल ही असतात. पण अचानक सोसाट्याचा वारा वादळ येत, आणि घरटे उलट होतं. पिल्लांना नाहक बळी जातात. पन चिमणा चिमणी थोडा कलकलाट करून नवीन घरटे बांधायला उडून जातात ! शोक करत रडत बसलेली मी कधीच बघितली नाहीत ! पाउस पडो न पडो तापलेली तडकलेली धरती, पावसाच्या सुखद थेंबांची वाट पाहत थांबते, पाऊस पडताच एखादे बीज छान अंकुरलेले दिसते.

किंग ब्रूस आणि कोळी याची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. कोळ्याची प्रयत्नांचे जिद्द बघून राजाच्या मनात आशा पल्लवीत होतात. राजाला धैर्य आणि ऊर्जा मिळून ती उर्जा राज्याला स्वातंत्र्य मिळवून देते.

एकूणच काय प्राणी पक्षी झाडे आणि निसर्गाच्या इतर शक्ती यांनी हा “व्यर्थ प्रयत्न चा कायदा” स्वीकारला आहे. पण माणूस ? विज्ञान आणि तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने मानवाला मात्र प्रत्येक प्रयत्नाला यश आलं पाहिजे, नाहीतर आपण अपयशी असं वाटतं. खरंतर व्यक्ती जेव्हा प्रयत्न करण थांबवते तेव्हा व्यक्ती अपयशी असते.

थॉमस एडिसन, अल्बर्ट आईन्स्टाईन, हेनद्री फोर्ड, वॉल्ट डिस्ने अशी सगळी यशस्वी लोक अनेक वेळा अयशस्वी होऊनच यशापर्यंत पोचली. अपयशाचा अर्थ यश न मिळणे नसून अपयश म्हणजे झालेल्या चुकानवर मात करत प्रत्येक टप्प्यावरील अडथळ्यांना पार करण्यात प्रयत्न कारणी लावणे आणि त्या प्रत्येक सुखान वरून काहीतरी शिकत जाणे, आलेल्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत जाणे. शिकण्याची एक एक संधी म्हणूया ना ! आपल्यातली सृजनशीलता कामी लावून अनुभवांचा वापर, काही नवीन पद्धतीसाठी करणे.

एखादा लेखक लिहिताना वेगवेगळे लेखन प्रकार लिहून बघतो, कथा लघुकथा, आता अलीकडे अति लघु कथा, दीर्घकथा कादंबरी, कविता, चारोळी, ललित, विज्ञान कथा, चरित्र, व्यक्तिचित्र हे हाताळून बघतो. मग त्याच्या लक्षात येतं की आपण हा विशिष्ट प्रकार जास्त चांगला लिहू शकतो. आणि असं करत तो एखादेवेळी उत्तम गीतकार किंवा नाटककार म्हणून प्रसिद्ध होतो, स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना बरेचदा वड्या करताना त्याचा गोळा होईपर्यंत गॅसवर न ढवलल्या गेल्यामुळे त्याच्या गुटगुटीत वड्यां न होता, लाडू वर समाधान मानावे लागते. मग चूक लक्षात येते आणि पुढच्या वेळेला सुधारणा केली जाते. नेहमीच ठराविक पद्धतीचा मसाले भात करण्याच्या ऐवजी, आपण काहीतरी वेगळे मसाले वापरून वेगळी चव आणतो, आणि मग तो भात पाहुण्यांमध्ये फारच भाव खाऊन जातो. हे आहे प्रत्येक अनुभवातून शिकणं. ही प्रक्रिया खूप आनंददायी असते. आणि यशा पेक्षा जास्त महत्वाची देखील असते. असं काही होत नाही कि वड्या जमल्याच नाही म्हणून मी वड्या करणंच सोडून देईल ! बोअरला पाणी लागत नाही, तो पर्यंत खोल जाणं सहसा कोणी सोडत नाही. कंपनीतल् एखादे डील जमले नाही म्हणजे आपण अयशस्वी झालो असं समजणं गैरचं ! प्रत्येक संधी …. प्रत्येक संधी यशाकडे जाणारी पायरी आहे असं समजून, “सातत्य “हा कळीचा मंत्र बनवला तर यश दूर राहणारच नाही. जे प्रयत्न चालूच ठेवतात ते त्यांच्या क्षेत्रामध्ये कधीतरी टॉपला जातातच !

फ्रेंड्स! So “Continue !” All over again & again !!!

ही बातमी पण वाचा : ” तेणे माझ्या चित्ता समाधान ! “

मानसी गिरीश फडके
(समुदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER