अमर-अकबर-अँथोनिचा संसार चांगला चालावा : दानवेंची टोलेबाजी

जालना :- राज्यातील महाविकास आघाडीवर तिरकस टीका करताना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले, अमर-अकबर-अँथनिचा संसार चांगला चालावा. निमित्त होते राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यातील सर्वपक्षीय नागरिक सत्कार. यावेळी दानवेंनीच चांगलीच टोलेबाजी केली.

तुमचा अमर अकबर अँथनिचा संसार चांगला चालवा, नाहीतर अर्ध्यावरच डाव मोडायचा. आम्हाला पुन्हा संधी देवू नका, तुमचा सारा खेळ खेळून घ्या. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. मात्र तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. असे म्हणत दानवेंनी महाविकास आघाडीला चिमटे काढले.

दानवे म्हणाले की, पिक्चर, क्रिकेट आणि राजकारणात सर्वांनाच यावे वाटते. पण पिक्चरमध्ये रिटेक घेता येतो. क्रिकेटमध्ये सराव होतो मात्र राजकारणात एकदा संधी सुटली तर विषय संपला. जसा चेंडू आला तसा टोलवावा लागतो.