कोरोनामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत?

Vidhan Bhawan

मुंबई :- कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या बैठका, कार्यक्रम, सण, उत्सव नेहमीप्रमाणे होऊ शकलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारतर्फे सुरू आहे. याबाबत नागपूर इथली तयारी कितपत आहे याचा आज आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, अधिवेशन नागपूर (Nagpur) ऐवजी मुंबईत (Mumbai) घेण्याचा आग्रह वाढू लागला आहे.

नागपूरला अधिवेशन घ्यायचे झाल्यास संपूर्ण शासकीय यंत्रणा मुंबई आणि इतर जिल्ह्यातून नागपूरला हलवावी लागते. कोरानाचे नियम पाळत इतक्या लोकांची राहण्याची सोय कशी करायची हासुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) याबाबत सरकार आणि विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर नागपूरचे आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरात होते. त्यामुळे आमदार निवासात राहायला आमदारांकडून विरोध केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER