विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून; दोन दिवस चालणार

Vidhan Parishad

मुंबई : कोरोना साथीच्या निर्बंधांचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणेच विधिमंडळाच्या अधिवेशनालाही बसला. पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपल्यानंतर आता हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस चालेल.

हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या नियोजनाबाबत तयारी विधिमंडळ कामकाज समितीकडून सुरू होती. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज समिती बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोनाच्या साथीमुळे वर्षभरात तिसरे अधिवेशन थोडक्यात आटोपावे लागत आहे.

मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर आटोपावे लागले होते. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पावसाळी अधिवेशन लांबणीवर टाकावे लागले होते व अखेरीस सप्टेंबरमध्ये पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपावे लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER