शिशिर ऋतुचर्या

शिशिर ऋतुचर्या

सहा ऋतुंपैकी शिशिर ऋतु हा अधिक थंड आणि अति रुक्षता आणणारा ऋतु. हेमंत ऋतुनंतर येणारा हा ऋतु त्यामुळे हेमंत ऋतुमधीलच आहारविहाराचे पालन या ऋतुमधे करण्यास सांगितले आहे. साधारण डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत शिशिरऋतु असतो. अर्थात आजकाल ऋतुविपर्यय जास्त जाणवतो. परंतु हेमंत शिशिर या ऋतुंमधे शरीराचे बल उत्तम असते. भूक छान लागते. खाल्लेले अन्न लवकर पचते. भाज्या फळे उत्तम प्रतीचे असतात. त्यामुळे आहारात विविध प्रकार करता येतात.

याकाळात सहा रसांपैकी मधुर अम्ल लवण रसांचे पदार्थ जास्त घ्यावेत. उदा. खीर लाडू हलवा, पंचामृत चटणी, खजूरचिंच चटणी, कोशिंबीर, द्राक्ष मोसंबी संत्री ही फळे, गव्हाचा दलिया, उडीद, मूग, तांदूळाचा वापर करावा. पौष्टीक अन्न घ्यावे. हा ऋतु शरीरात तसेच त्वचेला रुक्षता आणणारा असल्याने तेल तुपाचा वापर आवश्यक ठरतो. आहार नेहमी ताजा गरमागरम घ्यावा. दुध तूप लोणी दुधाचे पदार्थ अवश्य घ्यावे.

  • या काळात अग्नि पाचनशक्ति चांगली असते त्यामुळे बल वाढविणारा मांसाहार उपयोगी ठरतो.
  • रोज नियमित व्यायाम करावा. या काळात अधिक व्यायाम केलेला चालतो.
  • शरीराला तेलाने मालीश करणे.
  • उबदार घरात राहणे. घरात धूपन करणे. थंडीपासून शरीराचे उबदार कपड्यांनी रक्षण करणे.
  • थोडावेळ उन्हात बसणे. या नियमांचा अंतर्भाव रोजच्या विहारात करावा.

काय घेऊ नये –

  • तिखट तुरट कडू रसांचे पदार्थ कमी घ्यावे.
  • वेफर्स फरसाणसारखे कोरडे पदार्थ, शिळे पदार्थ.
  • थंड पदार्थ. थंड पाणी. फ्रीजमधील पदार्थ या ऋतुमधे घेऊ नये.
  • दिवसा झोपू नये.

हेमंत आणि शिशिरऋतुमधे शरीराची ताकद, बल पाचन शक्ति उत्तम असते. त्यामुळे कसून व्यायाम अभ्यंग व पौष्टीक आहार तेल तुपाचा वापर या सर्वांचा समावेश करण्यास सांगितला आहे. स्वास्थ्य रक्षणाकरीता ऋतुचर्येचे पालन नक्कीच फायदेशीर ठरते.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER