नाशिक महापालिका निवडणुकीचे वारे, भाजपकडून उद्घाटनांचा सपाटा, शिवसेनेचा आक्षेप

Nashik Municipal Corporation - Devendra Fadnavis

नाशिक : वर्षभरावर होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते येत्या 22 तारखेला नाशिकमध्ये 250 कोटी रुपयांची कामं आणि 2 उड्डाणपुलांचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, शिवसेनेनं (Shiv Sena) मात्र भाजप आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. एकीकडे शिवसेनेनं चौकाचौकात शाखा उद्घाटनाचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपनं आता विकासकामांच्या उदघाटनाचा धडाका लावण्याच्या कार्यक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून 22 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये 2 उड्डाणपूल आणि अडीचशे कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन होणार आहे.

शिवसेनेकडून मात्र भाजपच्या या उद्घाटन कार्यक्रमावर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे होत असलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला गेला आहे. सिडको उड्डाणपुलावरुन यापूर्वीच शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता नाशिक भाजपने फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची तारीखच जाहीर केली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER