कर्नाटकात नेतृत्वबदलाचे वारे; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सूचक विधान

B. S. Yediyurappa

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएएस येडियुरप्पायांचे (B. S. Yediyurappa) मुख्यमंत्रिपद जाणार असल्याच्या बातम्या अधूनमधून माध्यमांमध्ये झळकत असतात. मात्र आज त्यांनी, राज्यातील नेतृत्वबदलाबाबतच्या चर्चांबाबत सूचक विधान केले आहे. ‘पक्षनेतृत्व जेव्हा आदेश देईल, तेव्हाच राजीनामा देईन, असे सूचक विधान येडियुरप्पा यांनी केले आहे.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा समर्थकांनी दिल्याचे सांगितले जात आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. बी. एस. येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि तेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. त्यामुळे राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चा आता थांबवायला हव्यात. त्यांनी फक्त वक्तव्य केले की, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. कारण ते पक्षाचा आदेश मानणारे नेते आहेत, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एम. नारायण यांनी म्हटले आहे.

मला पक्षनेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं. तर मी तत्काळ राजीनामा देईन. पण मला वाटतं आजच्या घडीला तरी राज्यात नेतृत्वबदलासाठी कोणी पर्याय आहे, असं मला वाटत नाही. जिथपर्यंत दिल्लीतील नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे तिथपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर कायम असणार. ज्या दिवशी भाजपच्या हायकमांडकडून मला आदेश मिळतील त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र काम करेन, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button