पहिल्या टप्प्याच्या मतदानात २६ जागा जिंकू; अमित शहांचा दावा

नई दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत काल ३० जागांवर झालेल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत भाजपा २६ जागा जिंकेल. निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचे सरकार येईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. याचप्रमाणे आसाममध्ये पुन्हा आमचेच सरकार येईल, असे त्यांनी सांगितले.

या दोन्ही राज्यांत मतदारांनी मोठ्या संख्येत मतदान केले. हा भाजपासाठी शुभ संकेत आहे. मी मतदारांचे आभार मानतो. बंगालमध्ये आम्ही २०० पेक्षा जास्त जागा जिंकू. आसाममध्येही आमचा जागा वाढतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button