विल्यमसनने पुन्हा एकदा जिंकले लोकांचे मन

Ken Williamson

आयपीएलमध्ये (IPL) सनरायझर्स हैदराबादचे (SRH) खेळाडू बंधूभावाचे उत्तम दर्शन घडवित आहेत. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमझान (Holy Ramzan) महिना सध्या सुरू आहे आणि एसआरएच संघातील मुस्लीम खेळाडू रशिद खान, मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी आणि खलील अहमद हे रोजे पाळत आहेत. मात्र त्यांच्यासोबत कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) व केन विल्यम्सन (Ken Williamson) हेसुध्दा उपवास करत आहेत. संघातील या सदभावाचे क्रिकेट रसिकांनी खूप कौतूक केले आहे. विशेषतः केन विल्यम्सनबद्दल लोकांनी फारच चांगली मते व्यक्त केली आहेत.

2019 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडविरुध्द न्यूझीलंडवर चुकीच्या नियमांमुळे अन्याय झाला होता आणि विल्यमसनच्या नेतृत्वातील न्यूझीलंडचा संघ विश्वविजेतेपदापासून वंचित राहिला होता मात्र त्यावेळी कोणतेही आकांडातांडव न करता शांत राहुन विल्यमसनने लोकांची मने जिंकून घेतली होती. तेंव्हापासून लोकांमध्ये त्याच्याबद्दल चांगली भावना आहे. किती वेळा हा माणूस मन जिंकणार, शेवटी हृदय एकच आहे अशी भारी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.

दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये विल्यमसन अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही पण हे उपवास पाळून त्याने न खेळताच लोकांचे मन जिंकले आहे. आयपीएलच्या आधी बांगलादेशविरुध्दच्या मालिकेत तो जायबंदी झाला होता पण त्यातून तो आता झपाट्याने सुधारत असून त्याच्या फिटनेसबाबत फिजिओंशी बोलावे लागेल असे कर्णधार वाॕर्नरने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button