बाऊंड्री रुलबाबत विल्यम्सन होता अनभिज्ञ, मॉर्गनने करुन ठेवला होता होमवर्क

CWC Final 2019

लंडन : चौकारांच्या निकषावर विश्वविजेता ठरवणे हे सहज पचनी पडणारे नाही असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल म्हटले आहे. निर्धारीत 50 षटके आणि प्रत्येकी एक सुपर ओव्हरनंतरही हा सामना ‘टाय’च कायम राहिल्यावर बाऊंडरी काउंटबॕक नियमानुसार न्यूझीलंडचे विश्वविजयाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले तर यजमान इंग्लंडचे स्वप्न साकार झाले. या विलक्षण नाट्यमय सामन्यात इंग्लंडने एकूण 26 वेळा चेंडू सीमापार केला तर न्यूझीलंडला 17 वेळाच चेंडू सीमापार करण्यात यश आले. हा फरकच विजय आणि पराभवाचा फैसला करणारा ठरला.

सामन्याचा फैसला करणारी ही पध्दत योग्य आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात विल्यम्सन अतिशय शालिनतेने म्हणाला की ही परिस्थितीच पूर्णपणे अनपेक्षित होती. तुम्हालासुध्दा हा प्रश्न विचारावा लागेल आणि मला त्याचे उत्तर द्यावे लागेल याची तुम्हीसुध्दा कल्पना केलेली नसेल असे तो पत्रकारांना म्हणाला.

वाईट तर वाटलेच कारण दोन्ही संघांनी या क्षणासाठी प्रचंड मेहनत घेतलेली होती आणि त्यांच्यात फरक करण्याचे दोन-दोन प्रयत्नसुध्दा अपुरे पडले होते. त्यामुळे अशा निकालाची कल्पनाच केलेली नव्हती. नियम तर आधीपासूनच होते पण त्यांचा अशा पध्दतीने वापर करायची वेळ येईल असे कुणालाही वाटले नव्हते. म्हणून हा निकाल पचनी पडणे जरा अवघडच होते. मात्र क्रिकेटचा विजय झाला आणि तुम्हाला सर्वांना मजा आली असेल, असे विल्यम्सनने म्हटले आहे.

नियम तर होतेच पण सामन्यासाठी जाताना त्याचा विचार, आपला एखादा सीमापार फटका अधिक असावा असा विचार करुन कुणी खेळत नाही. दोन वेळा सामना टाय व्हावा. मला तर माहितही नव्हते की बाउंडरी काउंट असा काही प्रकार असतो पण आम्ही त्यात काहीसे मागे होतो हे मात्र खरेच असे न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला.

इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन म्हणाला की पाठलाग करत असताना बाउंडरी काऊंटची गरज पडू शकते अशी शक्यता आम्हाला वाटली होती आणि सामन्याच्या आधीपासूनच आम्ही या नियमाबाबत लक्ष ठेवून होतो. सुपर ओव्हरनंतरही टाय कायम राहिली तर चौकार- षटकार निर्णायक ठरतील असे केंव्हा वाटले या प्रश्नाच्या उत्तरात मॉर्गन म्हणाला की, आम्ही मैदानात उतरलो तेंव्हाच याची जाणिव होती. स्पर्धेपूर्वीच्या बैठकीतच काय काय होऊ शकते हे मी जाणून घेतलेले होते आणि अंतिम सामना जेंव्हा अटीतटीचा होऊ लागला तेंव्हा ती चर्चा आम्हाला आठवली आणि चौथे पंच अलीम दार हे जेंव्हा सूचना द्यायला आले तेंव्हा आम्ही या नियमाची खात्री करुन घेतली असे मॉर्गन मूहणाला.

विश्वविजेतेपद इंग्लंडने पटकावले असले तरी 578 धावा करुन केन विल्यमसन हा सा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय कसा घेतला याबद्दल तो म्हणाला की, खेळपट्टी कोरडी वाटत होती म्हणून धावा सहज निघतील असे वाटत होते परंतू तो अंदाज चुकीचा ठरला. मात्र आम्ही धावा जमवल्या पण त्या 10ते 20 कमी पडल्या, नंतर इंग्लंडालाही आम्ही दबावात ठेवले. दोन्ही संघांनी पूर्ण जोर लावून खेळ केला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना बरोबरीचा राहिला याचे श्रेय इंग्लंडला जाते आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.

शेवटच्या षटकात बेन स्टोक्सचूया बॕटीला लागून ओव्हर थ्रोच्या गेलेल्या चार अतिरिक्त धावांबद्दल विल्यम्सन म्हणाला की, हा प्रकार काहीसा लाजिरवाणा होता. अशा घटना घडू नयेत पण दुर्देवाने तसे घडले.

सुपरा ओव्हरमध्ये डावे-उजवे फलंदाज म्हणून जोरदार फटके मारणाऱ्या जिमि निशॕम व मार्टीन गुप्तीलला मैदानात उतरवल्याचे त्याने सांगितले.