‘शेजाऱ्याला बाळ झाल्यावर तुम्ही पाळणा हालवणार का’, मोफत लसीवरुन खोतांचा टोला

Maharashtra Today

सातारा : राज्यात वाढती कोरोना(Corona) रूग्णांची संख्या रोखण्यासाठी केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात येत्या १ मे पासून लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. तसे संकेत राज्यातील मंत्र्यांनी दिले होते. या मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. आणि यावरुन विरोधकांनी आघाडी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. याच मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सरकारवर विखारी टीका केली. ‘शेजाऱ्याला बाळ झालं की तुम्हा पाळणा हालवणार का,’ अशा शेलक्या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टीका केली. खोत यांनी आज साताऱ्यातील जंम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center)आणि शेजारीच नव्याने सुरु होणारे ७८ बेडच्या कोरोना केअर सेंटरची अचानक पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

राज्य सरकार सगळी मदत केंद्राकडून मागत आहेत. रेमडेसिवीर केंद्राककडून, ऑक्सिजन केंद्राने, लस केंद्राने, व्हेंटीलेटर केंद्राने, मग तुम्ही काय करताय. आज एक घोषणा पाहिली की १८ ते ४५ वयोगटातल्या सर्वांना मोफत लस देणार. हे तर केंद्राने जाहीर केलं. शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्ही पाळणा हालवणार का? असा खोचक प्रश्न खोत यांनी उपस्थित केला.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी राज्यसरकार तसेच शरद पवार यांना लक्ष्य केले. शरद पवारांनी सर्व साखर कारखाने कोरोना हॉस्पिटल उभारणार असल्याचे सांगितले. ही मात्र अद्याप एकाही कारखान्याने हॉस्पिटल उभारले नाही. आता कारखाने ऑक्सिजन पुरवणार असं म्हणतात. म्हणजे देहूच्या आळंदीला जायचं सोडून चोराच्या आळंदीला पोहचलेल्या लोकांनी सांगायचं पाकीट मारलेले पैसे परत दिले जाणार आहेत. असं कुठं घडू शकतं का, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे बेड उपलब्ध नाहीत, रूग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने ते तडफडून मरत असताना राज्यसरकारकडून कुठलीच हालचाल होताना दिसत नाही. राज्यातील आमदारांनी नियोजन समितीच्या फंडातून मिळालेले २० कोटी आपल्या मतदार संघात आणले. तसेच ठेकेदारांकडून कमिशन खाऊन ठेकेदारांना जगवण्याचं काम केलं,असा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button