महाराष्ट्र दिनी ठाकरे सरकारकडून मोफत लसीचं गिफ्ट मिळणार? अजित पवारांचे संकेत

Ajit Pawar - Coronavirus Vaccine - CM Uddhav Thackeray

पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्रातील लसीकरण (Vaccination) आणि ऑक्सिजनसह (Oxygen) इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील १८ वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेतही पवारांनी दिले. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले. आज कोरोना (Corona) आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, देशात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इतके दिवस आपल्या राज्याची जी गरज होती, ती भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. ऑक्सिजन टँकर विमानातून आणणे धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे केवळ रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी दिली. भरलेले टँकर रेल्वे, बाय रोड रो रो सेवेने येतील. केंद्राकडून ऑक्सिजन येण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर केंद्राचं नियंत्रण असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. बरेच पेशंट रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय पुढचा विचार करुन घेत आहोत. १८ ते ४४ वयामध्ये लसीसाठी केंद्र राज्यांवर जबाबदारी देत आहे. आम्ही ५ जणांची कमिटी बनवत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. बल टेंडरमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख असेल. इंजेक्शनचा तुटवडा आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. मुख्यमंत्र्यांचा तसा विचार आहे. १ मे रोजी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका सांगतील. ग्लोबल टेंडर काढू. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही, आमची क्षमता आहे तेवढी देऊ. इतर कंपन्यांच्या लसी घेण्याबाबत त्यांनी सांगितलं, असंही पवार यांनी नमूद केलं.

ऑक्सिजनचे जे बंद पडलेले प्लांट आहेत, ते तात्काळ सुरु करणार आहोत. काही वीजेअभावी बंद होते, काही आर्थिकदृष्ट्या बंद पडलेले होते. ते सुरु करत आहोत. पवारसाहेबांनी सूचना केली आहे, साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जामनगरचा जो कोटा आहे तो वाढवला नसला तरी कमी करु नका अशी केंद्राला विनंती केलीय, असं अजित पवार यांनी सांगितलं.

इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे, मात्र दोन-तीन दिवसात औषध कंपन्या प्राधान्य देतील असं सांगितलं पण केंद्राने पुन्हा त्यांचा ताबा घेतला. आमची केंद्राला विनंती आहे. मी गडकरींशी बोललो, ते म्हणाले विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा. असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही, असा विश्वसाहि त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : केंद्र सरकारने देशवासियांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी : नाना पटोले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button