काय वरुण धवन आणि नताशा दलाल या महिन्यात लग्न करणार आहेत? २०० लोकांसाठी केले हॉटेल बुक

varun dhawan & natasha dalal

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. वृत्तानुसार वरुण धवनने अलिबागमधील एका हॉटेलमध्ये २०० लोकांसाठी बुकिंग केले आहे. असे म्हटले जात आहे की कोविड -१९ मुळे केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य या उत्सवात सामील होतील. हे पंजाबी लग्न असेल.

एका वृत्तानुसार वरुण आणि नताशा जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार २०० लोकांची यादी तयार केली गेली आहे, जे वरुण आणि नताशाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. त्यांचे लग्न अलिबागमधील हॉटेलमध्ये होणार आहे.

अलीकडेच वरुण धवनने गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करण्याबद्दल म्हटले होते की, नताशा आणि मी निश्चितच लग्न करणार आहोत, पण त्याआधी सर्वकाही सुरळीत झाले पाहिजे. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येकजण याबद्दल बोलत आहे. याक्षणी काहीही मजबूत नाही. जगात खूपच उतार-चढाव आहे. यावर्षी गोष्टी जर ठरल्या तर मी लवकरच लग्न करण्यासाठी इंटरेस्ट घेत आहे.

नुकताच वरुण धवन लग्नासाठी हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला पोहोचला असल्याची माहिती आहे. सारा अली खान सोबत वरुणचा ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट २५ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. लोक म्हणतात की वरुण धवन हा आता एक रिमेक चित्रपट करणारा अभिनेता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER