१ मे नंतर लस नसल्यास केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?; पी. चिदंबरम यांचा सवाल

Maharashtra Today

नवी दिल्ली :- देशातील जनता मोदी सरकारला (PM Modi) मुर्ख समजत आहे. त्यामुळे जनतेने आता सरकारविरूद्ध उठाव करण्याची गरज आहे, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी मांडली. देशात कोरोना लस (Corona Vaccine) आणि ऑक्सिजनची कमतरता नाही, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhana) यांनी केले आहे. यावरून पी. चिदंबरम यांनी ट्विटद्वारे डॉ. हर्षवर्धन यांच्याबरोबरच मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

चिदंबरम म्हणाले, “राज्य १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी तयार नसल्याचा दावा केला. इतकेच नाही तर कोवीन अ‍ॅप्स सहकार्य करत नाही. जर १ मे नंतर लसीकरण केंद्रांवरून लोकांना घरी पाठवण्यात आले, तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? असे जाहीर आव्हान चिदंबरम यांनी दिले आहे. तसेच

आरोग्य मंत्र्यांच्या दाव्याने मी चकित झालो. वृत्तपत्रांमधील बातम्या आणि वृत्तवाहिन्यांचे प्रसारण चुकीचे आहे का? सर्व डॉक्‍टर खोटे बोलत आहेत का? रुग्णांचे कुटुंबीयही खोटी वक्‍तव्ये करत आहेत का, अशा प्रश्‍नांची सरबत्ती चिदंबरम यांनी केली.

वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशभर भयानक परिस्थिती उद्भवली आहे. लसी वेळेत उपलब्ध होण्याचे मोठे आव्हान राज्यांपुढे उभे आहे. यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button