पंढरपूरच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? दरेकरांचा मालिकांचा सवाल

Pravin Darekar - Nawab Mailk - Maharashtra Today

मुंबई : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना पराभूत केले. या निकालानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे.

पश्चिम बंगालमधील पराभवासाठी भाजपावर टीका करताना नवाब मलिक म्हणाले की, अमित शहा सांगत होते जनतेने सांगितले तर मी राजीनामा देईन. आता निकाल लागला आहे. अमित शाहांनी राजीनामा द्यायला हवा. यावर भाजपाचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सवाल केला – पंढरपुरच्या निकालानंतर मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार का ?

दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात अमित शहा यांनी तेथील अपयशासाठी राजीनामा देण्याची मागणी केली. मला वाटते त्यांना यशाची व्याख्याच माहिती नाही. भाजपा ३ वरुन आज ८० जागांवर पोहोचली आहे!

बेळगाव, पंढरपुरात भाजपाचा विजय झाला आहे. पंढरपूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी सरकार एकत्रित लढून सुद्धा पराभूत झाले; मग तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? असा प्रश्न दरेकरांनी नवाब मलिक यांना केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button