काँग्रेसशी निष्ठा राखण्याचे हेच फळ मिळणार? नाना पटोलेंसमोर कार्यकर्ते संतापले

Nana Patole

वर्धा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आजच्या वर्धा दौऱ्यात आमदार रणजीत कांबळे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी गाऱ्हाणे मांडले. संतप्त कार्यकर्त्यांनी नानांना विचारले – काँग्रेसशी निष्ठा राखण्याचे हेच फळ मिळणार?

पटोले यांच्या भेटीसाठी जिल्हाभरातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली होती. पत्रकारपरिषद आटोपताच नाना पटोले सेवाग्राम आश्रमला भेट देण्यासाठी रवाना झाले. विश्रामगृहावर उपस्थित असलेले आमदार रणजीत कांबळे यांची पटोलेंशी भेट झालीच नाही. त्यांच्या विरोधकांनी पटोलेंभोवती गर्दी केली होती.

विश्रामगृहावर भेट न झाल्याने पदाधिकारी पटोलेंपाठोपाठ सेवाग्रामला गेलेत. आश्रमातील भेट आटोपल्यावर माजी आमदार अमर काळे, प्रदेश सचिव शेखर शेंडे, माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ, माजी नियोजन मंडळ सदस्य प्रमोद हिवाळे, प्रवीण हिवरे, राजू शर्मा, सलिम कुरेशी, इक्राम हुसेन यांनी गाऱ्हाणी मंडळी.

निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे. त्यांना डावलले जाते. पक्षीय कार्यक्रमात व संघटनेत सहभागी करून घेतले जात नाही. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरू आहे. काँग्रेसशी निष्ठा राखण्याचे हेच फळ मिळणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button